Ad will apear here
Next
भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
महायुतीचे भक्कम सरकार लवकरच स्थापन करणार : फडणवीस


मुंबई :
भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी बुधवारी (३० ऑक्टोबर) मुंबईत भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केली. ‘राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून, महायुतीचे सरकार लवकरच स्थापन करण्यात येईल आणि गेल्या पाच वर्षांत राज्याच्या विकासासाठी जे काम केले त्यापेक्षा अधिक काम आगामी पाच वर्षांत करू,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.



केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नेता निवडीसाठी उपस्थित होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजप माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे, जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे, भाजप प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार अतुल भातखळकर, आमदार रामदास आंबटकर आणि सुरेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीने मते मागितली आणि जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला. महायुतीला स्पष्ट जनादेश असून, लवकरच महायुतीचे भक्कम सरकार स्थापन होईल.’ 

भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी उपस्थित आमदारांचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही त्यांनी साथ दिल्याबद्दल आभार मानले.

त्यांनी सांगितले, ‘गेल्या पाच वर्षांत समाजाच्या सर्व घटकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. आपले प्रश्न हेच सरकार सोडवू शकते, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला. गेल्या पाच वर्षांत केले त्यापेक्षा अधिक काम आगामी पाच वर्षांत करायचे आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतीला पाणी, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विकास हे आमचे प्राधान्याचे विषय असतील.’



चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि आशिष शेलार या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी अनुमोदन दिले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZRRCF
Similar Posts
‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार’ मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच नोव्हेंबर रोजी केले.
हर्षवर्धन पाटील यांचा ‘भाजप’मध्ये प्रवेश मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देश मजबूत करू शकतात आणि देशाचे भवितव्य घडवू शकतात, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांचा प्रचंड ओढा आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) मुंबईत केले. माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
‘आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून जाईल’ मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणे, पायाभूत सुविधांमध्ये पाच लाख कोटींची गुंतवणूक, एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती, प्रत्येक नोंदणीकृत बेघराला घर, शेतीला दिवसा १२ तास वीज, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी अशा १६ प्रमुख संकल्पनांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे
विधानसभा निवडणूक निकाल : भाजप-सेनाच आघाडीवर; असे आहे २८८ मतदारसंघांतील चित्र मुंबई : महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया सध्या सुरू असून, दुपारी पावणेतीन वाजता भारतीय जनता पक्ष ९३ जागांवर आघाडीवर होता, तर आठ जागांवर विजयी झाला होता. शिवसेनेने ५० जागांवर आघाडी मिळवली होती, तर आठ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस ५५, तर काँग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language